नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- झोपेत विषारी साप चावल्याने २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना एकलहरारोड भागातील अरिंगळे मळा येथे घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परवेझ मेहबुबु शेख (रा.मेहबुबनगर,अरिंगळे मळा) असे मृत तरूणाचे नाव आहे. परवेझ शेख हा रविवारी (दि.१५) रात्री आपल्या घरात झोपलेला असतांना ही घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास त्यास विषारी सापाने चावा घेतला.
ही बाब निदर्शनास येताच भाऊ आसिफ शेख याने त्यास बिटको हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता सकाळी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी तपासून त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.