रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

by India Darpan
जून 14, 2025 | 3:58 pm
in क्राईम डायरी
0
crime 88


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून नुकत्याच झालेल्या घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा सात लाख रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर, अंबड, सातपूर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ध्रुवनगर भागात राहणा-या तानाजी श्रावण कुवर यांनी घरफोडीची पहिली फिर्याद दिली आहे. कुवर कुटुंबिय गुरूवारी (दि.१२) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी कुवर यांच्या बंद घराच्या सेफ्टी डोअरचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४ लाख ५१ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महाजन करीत आहेत.

दुसरी घरफोडी चुंचाळे शिवारात झाली. मंदा राहूल ठोके (रा.घरकुल योजना अंबड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ठोके कुटूंबिय बुधवारी (दि.११) बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेल्या गल्यातील १२ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६१ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

तिसरी घटना सातपूर औद्योगीक वसाहतीतील सातमाऊली चौकात घडली. याबाबत अनिल धर्मराज खैरणार (रा.डिएस पार्क महेंद्रा मटेरिअल गेट समोर) यांनी फिर्याद दिली आहे. गुरूवारी (दि.१२) रात्री अज्ञात चोरट्यांनी खैरणार यांचे घरफोडून कपाटातील ४० हजाराची रोकड व सोन्याचे अलंकार असा समारे ४९ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

चौथी घटना नाणेगाव ता.जि.नाशिक येथे घडली. याबाबत पुतूलदेवी जिमदार सिंग यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सिंग कुटुंबिय गेल्या महिन्यात १५ ते २० दिवसांसाठी मुळगावी गेले होते. या काळात अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या किचनमधील खिडकीचे गज कापून ही चोरी केली. घरात शिरलेल्या भामट्यांनी लोखडी कपाटात ठेवलेली एक लाखाची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ६० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार जगदाळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

Next Post

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

Next Post
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

ताज्या बातम्या

Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
PANKAJA MUNDE 1 1024x1536 1 e1749951856825

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

जून 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011