नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून एका चारचाकीसह सहा मोटारसायकली चोरीस गेल्याच्या नोंदी पोलीस दप्तरी करण्यात आल्या आहेत. पोलीसांनी वेळीच चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली असून याप्रकरणी पंचवटी, सरकारवाडा, अंबड, उपनगर व गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळू उत्तम पाटील (रा.रामकृष्णनगर,सातपूर अंबड लिंकरोड) यांची एमएच ४८ एके ६६२५ ही चारचाकी गेल्या मंगळवारी (दि.१०) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत. मोटारसायकल चोरीचा पहिला प्रकार गोदाघाटावर घडला. याबाबत कमर्योगीनगर येथील अमिषा अजयकुमार सिंह यांनी फिर्याद दिली आहे. अमिषा सिंह या बुधवारी (दि.११) सायंकाळी गोदाघाटावर गेल्या होत्या. बुधवार बाजार परिसरात लावलेली त्यांची अॅक्टीव्हा एमएच ०६ बी ३२०९ चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेवाळे करीत आहेत.
दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. कृष्णा मिनानाथ जाधव (रा.जय अंबिका रो हाऊस कालिका मंदिरासमोर शिवाजीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जाधव यांची स्प्लेंडर एमएच १५ एचएक्स ८३१३ त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना बुधवारी (दि.११) रात्री घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणयत आला असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
तिसरी घटना त्र्यंबकरोडवर घडली. दिपक निवृत्ती लिलके (रा.आळंदी डॅम ता.दिंडोरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. लिलके गेल्या ३ मे रोजी शहरात आले होते. मायको सर्कल परिसरातील पाण्याच्या टँकर लावतात तेथे त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ जेके ९३२३ लावली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. चौथी घटना मेळा बसस्थानक भागात घडली. गणेश प्रभाकर पिंगळे (रा.वावरेनगर,अंबड लिंकरोड कामटवाडे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पिगळे गेल्या शुक्रवारी (दि.६) कामानिमित्त धुळे येथे गेले होते. बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची डिस्कव्हर एमएच १५ सीएक्स ०३१६ चोरट्यांनी पळवून नेली. दोन्ही घटनांप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार पाटील व साबळे करीत आहेत.
पाचवी घटना अंबड औद्योगीक वसाहतीतील दत्तनगर भागात घडली. गुड्डूसिंग प्रमोदसिंग (रा.कुलस्वामिनी सोसा.दत्तनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गुड्डूसिंग यांची स्प्लेंडर एमएच १५ जेटी ३८३७ गेल्या सोमवारी (दि.९) रात्री त्यांच्या राहत्या सोसायटीच्या पार्किगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत. तर सहावी घटना शिखरेवाडीत घडली. देवकुमार कालीपतकुमार भद्रा (रा.शिखरेवाडी ना.रोड) यांची स्प्लेंडर एमएच १५ जेई ३८६९ गेल्या गुरूवारी (दि.५) त्यांच्या सोसायटीच्या पार्किर्गमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.