नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पार्किंगमधील स्टोअररूममध्ये ठेवलेले शाळेतील विद्यार्थ्यांच्या कपड्यांनी भरलेली गोणी चोरट्यांनी चोरून नेली. या घटनेत ९० हजाराचे नुकसान झाले असून याप्रकरणी अबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद गंगाराम ठाकरे (रा.स्वामी कृपा रेसि.जगतापनगर उंटवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ठाकरे यांच्या पत्नीची एसएसटी एन्टरप्रायझेस नावाची फर्म असून या फर्मच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्याना कपडे पुरविले जातात. खेरवाडी ता. निफाड या शाळेकडून मिळालेल्या ऑर्डरचे २४२ शर्ट व २४२ पॅण्ट तयार करण्यात आले होते.
या कपड्यांनी भरलेली गोणी ठाकरे यांनी आपल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेल्या स्टोअररूममध्ये ठेवली असता ही घटना घडली. २३ मे ते ४ जून दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कपड्यांनी भरलेली सुमारे ९० हजार १४७ रूपये किमतीची गोणी चोरून नेली.