नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मानेनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे चार लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ५५ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश प्रकाश थोरात (रा.निर्मलनगर पोलीस चौकीजवळ मानेनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. थोरात कुटूंबिय रविवारी (दि.८) दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ५५ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ७३ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.