नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यानी पावणे पाच लाख रूपयांच्या रोकडवर डल्ला मारला. ही घटना गंगापूररोडवरील शहिद सर्कल भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर्शन चंद्रशेखर सोनार (रा.सिध्दीविनायक कॉलनी सावतानगर सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनार गुरूवारी (दि.५) लेबरसाठी पैसे काढण्यास एसबीआय बँकेत गेले होते. बँकेतून पैसे काढून ते शहिद सर्कल परिसरातील लीकर अॅम्बेसी समोरील अम्मास टिफीन कप्पी या हॉटेल समोर आपली कार पार्क करून ते नाष्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून मागील सीटीवर ठेवलेली लेदर बॅग चोरून नेली. या बॅगेत बँकेतून काढून आणलेली ४ लाख ८० हजार रूपयांची रोकड होती. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
…..
भरदिवसा झालेल्या घरफोडीत ६३ हजाराचा ऐवज चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- धोंडीरोड भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६३ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोनसाखळी व चांदीच्या अंगठ्याचा समावेश आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभेदार राजेश शहा (रा. जेसीवो मेस मर्चुरी मेसजवळ धोंडीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
शहा गेल्या ७ मे रोजी नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॉक कशाने तरी तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली साडे नऊ हजाराची रोकड सोनसाखळी व चांदीच्या अंगठ्या असा सुमारे ६२ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.








