नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कंपनी व्यवस्थापकाने लाखों रूपये किमतीच्या क्रॉफपेपरची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत सुमारे २ लाख ३७ हजार रूपये किमतीचे १३ रोल परस्पर दुस-या कारखानदारास विक्री करण्यात आले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद रत्नशिव शिंदे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत परिन बिपीन दौलत (रा.शरणपूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. परिन दौलत यांचा अंबड औद्योगीक वसाहतीत व्हेन्चुरा पॅकेजस प्रा.लि. नावाची कंपनी असून या कारखान्यात संशयित स्टॉक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
गेल्या चार महिन्यास सशयिताने व्हेन्चुरा पॅकेजींग कंपनीतील ७ हजार २२२ किलो वजनाची व २ लाख ३७ हजार १९३ रूपये किमतीचे क्रॉफ पेपरचे १३ रोल परस्पर नजीकच्या एस.ए. पॅकेजींग कारखान्यास विक्री केले. ही बाब निदर्शनास येताच परिन दौलत यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.