नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून एकाने महिलेस फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. बारा वर्ष लीव अॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहणा-या संशयिताने धर्मांतराचा आग्रह धरत महिलेसह मुलास सांभाळण्यास नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद आलम ३७ वर्षीय व्यक्तीविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर येथील श्रमिकनगर भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. सन.२०१३ मध्ये पीडितेची संशयिताशी ओळख झाली होती. ओळखीतून दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याने ही घटना घडली. संशयिताने लग्नाचे आमिष दाखविल्याने दोघे गेली बारा वर्षापासून लिव्ह अॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहत होते.
कायदेशीर लग्न न करता एकत्रीत राहत असल्याने दोघांमध्ये शारिरीक संबध निर्माण झाले. याकाळात पीडितेने गोंडस मुलास जन्म दिला त्यानंतर संशयिताने मायलेकाची जबाबादारी घेण्यास टाळाटाळ केली. याबरोबरच घरखर्चासाठी पैश्यांची मागणी करीत धर्मांतरासाठी आग्रह धरला. पीडितेने त्यास नकार दिल्याने संशयिताने मायलेकास घराबाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक नळकांडे करीत आहेत.