इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकमध्ये नर्सिंग कॅालेजमधील प्राचार्य प्रवीण घोलप यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा भद्रकाली पोलिस स्थानकात दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. चार विद्यार्थींनीचा विनयभंग केल्याची तक्रार आल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित विद्यार्थींनी ५ ऑगस्ट २०२४ पासून २९ मे २०२५ पर्यंत व्दारका सर्कल येथील एका कॅालेज ऑफ नर्सिंग येथे शिक्षण घेत होती. या काळात प्राचार्य प्रवीण घोलप यांनी वारंवार पीडितेस त्रास देत शारीरिक संबधाची मागणी केली. तिच्या खांद्यावर, छातीवर आणि पाठीवर हात फिरवला. तसेच हात हातात घेऊन अश्लिल स्पर्श केला. त्याने पीडितेची साडी ओढण्याचा प्रयत्न करत अश्लील नजरेने पाहून तिचा विनयभंग केला.
या घटनेनंतर पीडित विदयार्थींनीने पोलिस स्थाकात धाव घेतली. त्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. तिच्या अन्य मैत्रीण बरोबरही असाच प्रकार घडला असल्याची माहिती तिने दिली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चार वेगवेगळे गुन्हे दाखल केले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव करत आहे.