रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये दुचाकीवर प्रवास करणा-या व पार्किंगमध्ये फोनवर बोलणा-या महिलेचा विनयभंग…दोन वेगवेगळ्या घटना

by India Darpan
मे 31, 2025 | 4:17 pm
in क्राईम डायरी
0
rape

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात विनयभंगाचे प्रकार वाढले असून दुचाकीवर प्रवास करणा-या महिलेसह इमारतीच्या पार्किंगमध्ये फोनवर बोलणा-या महिलेचा एकाने विनयभंग केला. याप्रकरणी पंचवटी व मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटीत राहणारी पीडित महिला शुक्रवारी (दि.३०) दुचाकीने आपल्या कामावर जात असतांना ही घटना घडली. के.के.वाघ कॉलेज परिसरातील भवानी मार्बल समोरूम महिला प्रवास करीत असतांना पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांना तूम्ही वोडाफोनमध्ये काम करता का असे विचारले. महिलेने त्यास ऑफिसमध्ये येवून बोला असे म्हणत आपल्या वाहानाचा वेग वाढविला असता संशयिताने ओव्हरटेक करून पीडितेची वाट अडविली. यावेळी त्याने महिलेचा हात पकडून भररस्त्यात विनयभंग केला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.

दुसरी घटना खोडेनगर येथे घडली. हसन मस्जीद परिसरात राहणारी पिडीता गुरूवारी (दि.२९) रात्री राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये बसून आपल्या सासूशी फोनवर बोलत असतांना ही घटना घडली. त्याच इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणाºया शकिल शेख या संशयिताने महिला एकटी असल्याची संधी साधत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

परदेशात राहणाऱ्या भारतीयांना लक्ष्य करणाऱ्या सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात दोन व्यक्तींना अडीच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

Next Post

भाजपाच्या उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा…नाशिकमध्ये यांना संधी

Next Post
bjp11

भाजपाच्या उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा…नाशिकमध्ये यांना संधी

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011