रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

स्थानिकाला हाताशी धरून दुकाने फोडणारी दोघा भावांची परप्रांतीय टोळी पोलीसांच्या हाती

by India Darpan
मे 31, 2025 | 1:15 pm
in क्राईम डायरी
0
crime1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– स्थानिकाला हाताशी धरून ग्रामिण भागातील दुकाने फोडणारी दोघा परप्रांतीय भावांची टोळी पोलीसांच्या हाती लागली आहे. सिन्नर घोटी मार्गावरील पांढुर्ली शिवार, सोनजांब ता. दिंडोरी व आडगाव शिवार पायदळी तुडवत स्थानिक गुन्हे शाखेने चौघांना बेड्या ठोकल्या असून त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे. या टोळीने जिह्यातील वेगवेगळ््या ठिकाणची दोन टायरचे दुकान,वॉईन शॉप आण कपड्यांचे दुकान फोडल्याची कबुली दिली असून त्यांच्या अटकेने सात गुह्यांचा उलगडा झाला आहे. या टोळीत चोरीचे टायर खरेदी करणाºया दोघा व्यावसायीकांचाही समावेश आहे. संशयितांच्या ताब्यातून सेन्ट्रो कारसह दुकान फोडण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे तसेच चोरीचे ७० टायर असा १ लाख ४५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

खुर्शिद उर्फ शेरा अब्दुल हमीद शेख (४२ रा. धानौरा जि. सिध्दार्थनगर उत्तरप्रदेश) व संदिप उर्फ भावड्या शिवाजी गवळी (२८ रा.सोनजांब ता. दिंडोरी) यांच्यासह मोहमंद अन्वर अन्सारी (३० रा.मुळ उत्तरप्रदेश हल्ली विश्वकर्मा गॅरेज आडगाव शिवार) व मोहम्मद सर्फराज मोहम्मद जैनुल कह (३६ मुळ रा.बिहार हल्ली दुधबाजार बडी दर्गा शेजारी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून अशरफ हमीद शेख (रा. धानौरा जि. सिध्दार्थनगर उत्तरप्रदेश) हा अद्याप फरार आहे. अटक केलेल्या संशयितामध्ये मोहम्मद अन्सारी व मोहम्मद जैनुलकह हे दोघे व्यावसायीक आहेत. मोहाडी ता. दिंडोरी येथे बुधवारी (दि.२८) रात्री चोरट्यांनी टायरचे दुकान फोडून सुमारे ७० हजार रूपये किमतीचे वाहनांचे टायर चोरून नेले होते. याप्रकरणी खंडेराव घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. असाच घरफोडीचा प्रकार गेल्या सोमवारी (दि.२६) पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीत घडला होता. पिकअप वाहन चोरून नेत चोरट्यांनी महामार्गावरील केशर अ‍ॅटो एजन्सी दुकान फोडून सुमारे ७ लाख १७ हजार ७६० रूपये किमतीचे टायर चोरून नेले होते. याच रात्री पालखेड व चांदोरी येथेही दुकान फोडीच्या घटना घडल्या होती. यापार्श्वभूमिवर पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरी करण्याच्या पध्दतीवरून खबरे सतर्क केले असता या घरफोड्या परराज्यातील सराईत खुर्शिद शेख व अशरफ शेख या भावांनी केल्याचा अंदाज बांधण्यात आला.

दोन चार दिवसात स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धरून घरफोडी करण्यात माहिर असलेल्या शेख बंधू इप्सित साध्य होताच मुळगावी अथवा नेपाळ बॉर्डर भागात निघून जात असल्याने ते पोलीसांच्या हाती लागत नव्हते. राज्यात ३५ – ४० हून अधिक गुन्हे असलेल्या दोघे भाऊ गेल्या सात वर्षापासून नाशिक पोलसांना गुगारा देत होते. सुतावरून स्वर्ग गाठत एलसीबीने वरिल चौघांच्या पांढूर्ली सोनजांब व आडगाव शिवारात मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून सेट्रो कारसह चोरीचे ७० टायर असा सुमारे एक लाख ४५ हजार रूपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या टोळय़ाच्या अटकेने जिह्यातील सात गुन्हे उघडकीस आले असून त्यांचा साथीदार हाती लागताच गुन्हा उलगडा संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. संशयितांना मुद्देमालासह दिंडोरी पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई अधिक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रविंद्र मगर, उपनिरीक्षक हर्षल भोशे, जमादार नवनाथ सानप,शिवाजी ठोंबरे,अंमलदार विनोद टिळे, नवनाथ शिरोळे,हेमंतर गिलबिले,किशोर खराटे,प्रदिप बहिरम व संदिप नागपुरे आदींच्या पथकाने केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गोवा बनले पूर्ण साक्षर राज्य….केरळनंतर देशातील दुसरे राज्य

Next Post

अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण…इन्स्टाग्रामचे आयडी न दिल्याचा राग

Next Post
instagram

अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण…इन्स्टाग्रामचे आयडी न दिल्याचा राग

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011