नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून एकाने युवतीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत गर्भपात करीत संशयिताने लग्नास नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्निल ताराचंद वाघचौरे (२८) असे संशयिताचे नाव आहे. सिडको परिसरात राहणा-या युवतीने याबाबत फिर्याद दिली. संशयित आणि पीडिता एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात प्रेमसबंध होते. संशयिताने लग्नाचे आमिष दाखविल्याने दोघांमध्ये शरिरसंबध झाले. यातून पीडीता गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपात करण्यात आला.
तरूणीने त्यानंतर संशयिताकडे लग्नाचा तगादा लावला असता त्याने विवाहास नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.