शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

धक्कादायक….नायब तहसिलदार असल्याचे भासवून महिलेस लग्न करण्याचे आमिष दाखवून लाखोंला गंडा….

by Gautam Sancheti
मे 29, 2025 | 3:37 pm
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महसूल विभागात नायब तहसिलदार असल्याचे भासवून एका ठकबाजाने महिलेस लग्न करण्याचे आमिष दाखवून लाखोंना चूना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. पदोन्नती मिळविण्यासाठी लाखोंची रोकड उकळवत भामट्याने महिलेस गंडविले असून, चौकशीअंती पितळ उघडे पडल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निनाद प्रविण कापुरे उर्फ निनाद विनय कापुरे (रा.एरंडोलरोड धारणगाव जळगाव) असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. बळी मंदिर परिसरात राहणा-या ३८ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. सन. २०२४ मध्ये संशयित महिलेच्या संपर्कात आला होता. महसूल विभागात नायब तहसिलदार पदावर कार्यरत असल्याची बतावणी केल्याने दोघामध्ये मैत्री झाली. संशयिताने विश्वास संपादन केल्याने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या काळात अबला महिलेस संशयिताने लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर एके दिवशी त्याने तहसिलदार पदी पदोन्नती मिळणार असून पुणे येथे नियुक्ती मिळविण्यासाठी मोठी रक्कम लागणार असल्याचे सांगितले. यावेळी त्याने महिलेस विश्वासात घेत सात लाख रूपयांची मदत मागितली. सदर रक्कम दोन ते तीन दिवसात परत करण्याची ग्वाही देत संशयिताने लग्नननंतर

आपले भविष्य चांगले होईल असे आमिष दाखवत महिलेस शोधाशोध करण्यास भाग पाडले. संशयिताने तगादा लावल्याने पीडितेने नातेवाईकांकडून हातऊसनवार रक्कम गोळा करीत ३ व ४ डिसेंबर २०२४ रोजी अनुक्रमे ५० हजार, तीन लाख व अडिच लाख रूपये आरटीजीएसच माध्यमातून तर फोन पे च्या माध्यमातून एक लाख रूपये अदा केले. मात्र अनेक दिवस उलटूनही सशयिताने पैसे परत न केल्याने महिलेने त्याचा पाठपुरावा केला असता संशयिताने टाळाटाळ केली. मी अडचणीत आलो असून लवकरच तुझे पैसे परत करील अशी बतावणी करीत तसेच पुण्यात असल्याचे सांगून वेळ मारून नेली. यानंतर महिलेने त्याचा शोध घेत चौकशी केली असता त्याचा खोटारडेपणा समोर आला. उच्चपदस्थ अधिकारी नसतांना संशयिताने खोटे नाव सांगून पीडितेस आपल्या गळाला अडकविल्याचे लक्षात आले. महिलेने संशयिताशी संपर्क साधत पोलीसात जाण्याची धमकी दिली असता त्याने दोन लाख रूपयांची रक्कम परत केली. तरीही महिलेने पोलीसात धाव घेतली असून पाच लाख रूपयांची फसवणुक केल्याचा आरोप तिने केला आहे. अधिक तपास हवालदार बनकर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांची तोडफोड, दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी देत बेदम मारहाण

Next Post

नाशिक शहरात अनधिककृत होर्डिंग्जविरोधात थेट गुन्हे…महापालिका आयुक्तांनी दिले आदेश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
NMC Nashik 1

नाशिक शहरात अनधिककृत होर्डिंग्जविरोधात थेट गुन्हे…महापालिका आयुक्तांनी दिले आदेश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011