सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांची तोडफोड, दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी देत बेदम मारहाण

by India Darpan
मे 29, 2025 | 3:26 pm
in क्राईम डायरी
0
crime1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– किशोर सुर्यवंशी मार्गावरील ओंकारनगर भागात टोळक्याने मंगळवारी (दि.२८) मध्यरात्री दहशत माजविली. इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांची तोडफोड करीत टोळक्याने दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केली. या घटनेत एकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून भामट्यांनी पोबारा केला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनू धात्रक, प्रिन्स सहाणी, चेतन गायकवाड,प्रणव मनेरे व त्यांचे दहा बारा साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यातील सोनू धात्रक हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याप्रकरणी प्रदिप बाबुलाल काकडे (रा.ओमकारनगर,किशोर सुर्यवंशी मार्ग) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित टोळक्याने मंगळवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास परिसरात दहशत माजवित धुडघूस घातला. यावेळी संतप्त टोळक्याने कुठलेही कारण नसतांना आपला मोर्चा काकडे यांच्या सोसायटीकडे वळवित हे कृत्य केले. इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या एमएच १४ एचडब्ल्यू ७०८१, एमएच १५ एए ३०४९, एमएच ४१ बीई ६८८९ व एमएच १५ डीसी १६९६ या वाहनांच्या दगड, विटा व कोयत्याने काचा फोडल्या.

यावेळी सोसायटीचे सदस्य विजय रावळ व तक्रारदार प्रदिप काकडे यांनी विरोध केला असता संशयितांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत लाकडी दांडक्यासह हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. या घटनेत एकाने जीवे ठार मारण्याची धमकी देत काकडे यांच्या गळय़ातील सुमारे ९० हजार रूपये किमतीची सोनसाखळी बळजबरीने हिसकावून पोबारा केला असून अधिक तपास उपनिरीक्षक परदेशी करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सीबीआयने ज्युनियर पासपोर्ट असिस्टंट आणि एका एजंटला केली अटक…हे आहे कारण

Next Post

धक्कादायक….नायब तहसिलदार असल्याचे भासवून महिलेस लग्न करण्याचे आमिष दाखवून लाखोंला गंडा….

Next Post
fir111

धक्कादायक….नायब तहसिलदार असल्याचे भासवून महिलेस लग्न करण्याचे आमिष दाखवून लाखोंला गंडा….

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011