रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पूर्व वैमनस्यातून एकमेकांवर प्राणघातक हल्ला…दोन्ही गटातील चौघांना अटक, दोन महिलांचाही समावेश

by India Darpan
मे 29, 2025 | 7:58 am
in क्राईम डायरी
0
crime1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पूर्व वैमनस्यातून रहदारीच्या ठिकाणी एकमेकांवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार महामार्गावरील इनायत कॅफे हॉटेल भागात घडला. या घटनेत एकाचा गळा चिरण्यात आला असून दुस-यास बेदम मारहाण करण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने दोन्ही गटातील चौघांना अटक केली असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे.

रोहित रंगनाथ गोरडे, मयुरी रोहित गोरडे (रा.दिक्षीत चाळ,खैरे गल्ली भद्रकाली), ऐश्वर्या विकास भुजग (रा.मुंबईनाका) व दिगंबर उर्फ दत्ता निवृत्ती आंधळे (रा.कलानगर दिंडोरीरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दिपक संजय कपीले ( ३५ रा.श्री दुर्वांकुर अपा.रविवार कारंजा) या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी (दि.२५) रात्री दहा वाजेच्या सुमारास दिपक कपीले आपल्या घरी असतांना संशयित गोरडे यांच्या पत्नीने त्याच्याशी संपर्क साधला होता. पतीसह आम्ही तीन महिला इनायत कॅफे या हॉटेल परिसरात मद्यपान करीत असतांना एकीचा नवरा तेथे आला व तो मैत्रीणीस बेदम मारहाण करीत असल्याचे खोटे सांगितले. त्यामुळे कपीले मित्र दत्ता आंधळे यास सोबत घेवून इनायत कॅफे भागात गेला असता त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

मद्यधुंद गोरड याने शिवीगाळ करीत तुला ठरवून बोलावले असून आज तुझा गेमच वाजवतो असे म्हणत कपीलेवर हल्ला केला. या घटनेत कमरेला लावलेले धारदार शस्त्र काढून कपीलेच्या गळयावर वार करण्यात आला असून झटापटीत त्याच्या कानासही चावा घेण्यात आला आहे. तर मयुरी गोरडे या विवाहीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार इनायत कॅफे या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो असता दिपक कपिले याने इंदिरानगर जॉंगीग ट्रॅक भागात बोलावून घेत पतीवर जिवघेणा हल्ला केला. दिपक व त्याचा मित्र दत्ता आंधळे याने पतीस शिवीगाळ करीत सोबत आणलेल्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत पतीच्या डोक्यास व डोळयास गंभीर दुखापत झाली असल्याचे म्हटले आहे.

याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून युनिटचे हवालदार प्रशांत मरकड व पोलीस नाईक मिलींदसिंग परदेशी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गोरडे दांम्पत्यास सिडकोतील त्रिमुर्ती चौकातील शिवशक्ती चौक भागात अटक करण्यात आली आहे. तर अन्य महिलेस जुनी तांबटलेन येथील इच्छामणी प्राईड या इमारतीतून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान ही कारवाई सुरू असतांनाच पोलीस नाईक विशाल देवरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रतिस्पर्धी गटातील दत्ता आंधळे यास चोपडा लॉन्स भागात बेड्या ठोकण्यात आल्या असून संशयितांना मुंबईनाका पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक रविंद्र बागुल,चेतन श्रीवंत,सुदाम सांगळे हवालदार प्रशांत मरकड, विशाल काठे, संजिप भांड, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, योगीराज गायकवाड,नाझीमखान पठाण, पोलीस नाईक मिलींदसिंग परदेशी, विशाल देवरे अंमलदार अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, हवालदार शर्मिला कोकणी, अनुजा येलवे, उपनिरीक्षक किरण शिरसाठ व समाधान पवार आदींच्या पथकाने केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील शाळांमध्ये ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम…माजी सैनिकांमार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

Next Post

सीबीआयने ज्युनियर पासपोर्ट असिस्टंट आणि एका एजंटला केली अटक…हे आहे कारण

Next Post
cbi

सीबीआयने ज्युनियर पासपोर्ट असिस्टंट आणि एका एजंटला केली अटक…हे आहे कारण

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011