शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लग्न सोहळय़ात चो-या करणारा धुळय़ाचा चोरटा पोलीसांच्या हाती…अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता

by Gautam Sancheti
मे 25, 2025 | 12:25 pm
in क्राईम डायरी
0
jail11


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लग्न सोहळय़ात हात की सफाई करणारा धुळय़ाचा चोरटा पोलीसांच्या हाती लागला आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ पथकाने भामट्यांच्या मुसक्या आवळत त्याच्या ताब्यातून रोकडसह सोन्याचांदीचे अलंकार व दुचाकी असा सुमारे पावणे चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मुद्देमालासह संशयितास सातपूर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून त्याच्या अटकेने शहरातील लॉन्स व मंगलकार्यालयात झालेल्या चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे.

प्रशांत देवानंद राणे (३४ मुळ रा. ओम कॉलनी जुने धुळे हल्ली सत्यम वाईन पाठीमागे ध्रुवनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पपया नर्सरी परिसरातील सौभाग्य मंगल कार्यालयात गुरूवारी (दि.२२) चोरी झाली होती. व-हाडी मंडळी विवाहाच्या घाई गडबडीत असतांना चोरट्यांनी वधू पक्षाच्या रूममधील दागिण्यांवर डल्ला मारला होता. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. सातपूर पोलीसांसह शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ पथकाने घटनास्थळ गाठून परिसरातील सीसीटिव्हीची पाहणी करून फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजच्या आधारे तपास सुरू असतांना युनिटचे हवालदार सुनिल आहेर व अंमलदार तेजस मते यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आयटीआय पाठीमागील स्वारबाबानगर कडे जाणाºया रस्त्याने चोरटा एमएच १५ जीटी ९५९७ या मोपेड दुचाकीवर चोरटा चोरीचे सोने विक्री करण्यासाठी जाणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने संशयिताची वाट अडवित मुसक्या आवळल्या असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

त्याच्या अंगझडतीत रोकडसह चोरीचे सोन्याचांदीचे अलंकार व गुन्हयात वापरलेली दुचाकी असा सुमारे ३ लाख ७८ हजार रूपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितास मुद्देमालासह सातपूर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून त्याच्या अटकेने विवाह सोहळयातील अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई युनिटचे प्रभारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक डॉ. समाधान हिरे, उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, यशवंत बेंडकोळी, जमादार बाळू शेळके,विलास गांगुर्डे,गुलाब सोनार,हवालदार संजय सानप,नंदकुमार नांदुर्डीकर,सुनिल आहेर,चंद्रकांत गवळी,अतुल पाटील,प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोहर शिंदे,अंमलदार तेजस मते,प्रविण वानखेडे,सुनिल खैरणार,जितेंद्र वजीरे तसेच तांत्रीक विश्लेषणचे सहाय्यक निरीक्षक जया तारडे आदींच्या पथकाने केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शैक्षणिक कर्जाच्या मोबदल्यात तारण ठेवलेल्या प्रॉपर्टीचा परस्पर लिलाव करणे बँक अधिकारी व कर्मचा-यांना पडले महागात

Next Post

केरळ किनारपट्टीजवळ धोकादायक माल वाहून नेणारे लिबेरियन कंटेनर जहाज बुडाले

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 47

केरळ किनारपट्टीजवळ धोकादायक माल वाहून नेणारे लिबेरियन कंटेनर जहाज बुडाले

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने रेल्वे पार्सल क्लर्कला लाच घेताना केली अटक…

ऑगस्ट 22, 2025
Gy3nWP8WwAAiwvz e1755850108280

ऑनलाईन गेमिंग प्रचार प्रसार आणि नियमन विधेयकाचे ​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले स्वागत…

ऑगस्ट 22, 2025
प्रातिनिधिक फोटो

भारतीय रेल्वे गणपती विशेष रेल्वेगाड्यांच्या ३८० विक्रमी फेऱ्या चालवणार

ऑगस्ट 22, 2025
IMG 20250820 WA0222 1

आज रेखाताई नाडगौडा यांच्या संकल्पनेतून साकारणार आम्ही मराठी नृत्याविष्कार…तीन दिवस रंगणार महोत्सव

ऑगस्ट 22, 2025
image002MFJ9

संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित…दोन्ही सभागृहात केली १५ विधेयके मंजूर

ऑगस्ट 22, 2025
Untitled 36

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी पाळणाघरे सुरू होणार…मिशन शक्ती अंतर्गत मान्यता

ऑगस्ट 22, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011