गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

by India Darpan
मे 18, 2025 | 7:32 am
in क्राईम डायरी
0
court 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) जिल्हा व सत्र न्याययालयाने सात वर्ष सश्रम कारावास व नऊ लाख तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यातील दोन जण अद्याप फरार असून ही घटना सातपूर पोलीस ठाणे हद्दीत २४ सप्टेंबर २०१९ रोजी खोडेपार्क भागात घडली होती.

मिलनसिंग रामसिंग भादा (४३), गजानन उर्फ भोंदया मोतीराम कोळी (२७) व किस्मतसिंग रामसिंग भादा (३५ रा. मोहाडी ता.जि.धुळे) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २४ सप्टेंबर रोजी रात्री हिरावाडीतील विधातेनगर भागात एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. हा प्रयत्न अयशस्वी झाल्याने टोळक्याने आपला मोर्चा खोडेपार्क येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमकडे वळविला होता. या ठिकाणी चोरट्यांनी एटीएम फोडून लोखंडी कॅश बॉक्स टायर रोपच्या सहाय्याने एमएच १५ जीके ७७३४ व एमएच १९ एएक्स ३२६० या दोन नंबर असलेल्या बोलेरो वाहनात ठेवत असतांना ही घटना घडली होती. गस्तीवरील सातपूर पोलीसांच्या दुचाकीस्वार अंमलदाराच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी हटकण्याचा प्रयत्न केला असता टोळक्याने धारदारशस्त्राचा धाक दाखवत एटीएम सोडून पोबारा केला होता.

संबधीत अंमलदारांनी ही घटना तात्काळ नियंत्रण कक्षास कळविल्याने पाठलागात सातपूर पिटर मोबाईल व अन्य सरकारी वाहनाना कट मारत तसेच अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करून पोबारा केला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात वरिल तीन आरोपींसह तलवारसिग जन्नतसिंग भागा (२०), आधाजसिंग कृपालसिंग भागा (४५ रा.दोघे मोहाडी ता.जि.धुळे) व रामसिंग राजूसिंग जुन्नी उर्फ रामसिंग धनसिंग भोंड (२५ रा.गंजमाळ) आदींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात मोक्कान्वये कायद्यान्वये गुह्यात वाढ करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक आयुक्त अनिरूध्द आढाव यांनी केला. तीन संशयितांच्या मुसक्या आवळून पोलीसांनी पुराव्यानिशी दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला कोर्ट क्र. १ चे जिल्हा व सत्र न्यायाधिश बी.व्ही.वाघ यांच्या समोर चालला. सरकार तर्फे अ‍ॅड. सुधीर कोतवाल,रेश्मा जाधव व शैलेश सोनवणे यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून वरिल तीन आरोपींना विविध कलमान्वये प्रत्येकी सात वर्ष सश्रम कारावास व नऊ लाख तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

Next Post

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

Next Post
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011