गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बालकामगार नियुक्त करणे सोसायटीच्या महिला चेअरमनच्या अंगलट…गुन्हा दाखल

by India Darpan
मे 18, 2025 | 7:06 am
in क्राईम डायरी
0
fir111

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– इमारतीत झाडू पोच्या करण्यासाठी बालकामगार नियुक्त करणे एका सोसायटीच्या महिला चेअरमनच्या चांगलेच अंगलट आले आहे. मुलांची काळजी व संरक्षण कायद्यान्वये कमी पगारात श्रमाचे काम करून घेतल्याचे उघड झाल्याने सदर महिले विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार स्मिता चरणजित कटोरोडे (रा. आराधना रेसि.आर्टीलरी सेंटर रोड नाशिकरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिला चेअरमनचे नाव आहे. याबाबत दुकान निरीक्षक सुरेश लोहार यांनी फिर्याद दिली आहे. कटोरोडे या आराधना रेसिडन्सी या सोसायटीच्या चेअरमन असून त्याच्या इमारतीत बालकामगाराकडून झाडू पोच्या करून घेतला जात असल्याची माहिती कामगार उपायुक्त कार्यालयास प्राप्त झाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.१६) सकाळी पथकाने शिवकॉलनीतील आराधणा रेसिडेन्सी ए विग व बि विग येथे छापा टाकला असता तेथे गाडेकर मळा भागात राहणारा पंधरा वर्षीय मुलगा काम करतांना मिळून आला. सदर बालकामगार ईमारतीमध्ये झाडु मारणे, आपार्टमेंटची सापसफाई करणे इत्यादी कामे करीत होता.

पथकाने केलेल्या चौकशीत तो महिना भरापासून या सोसायटीत काम करीत असून त्याला सकाळी सहा ते दुपारी बारा या दरम्यानच्या कामाच्या मोबदल्यात दरमहा चार हजार रूपये पगार दिला जातो. तसेच रविवारी सुट्टी मिळत असल्याचे त्याने सांगितले. चेअरमन महिलेकडून कमी वेतनात जास्त श्रमाचे काम करून त्यांचे आर्थिक, मानसिक, शारिरीक शोषण निदर्शनास आल्याने पथकाने बालकामगाराची सुटका करीत त्याची काळजी व सुरक्षेच्या दृष्टीने उंटवाडी येथील बाल निरीक्षण गृहात रवानगी केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक बोडके करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आज महाराष्ट्रात….असे आहे कार्यक्रम

Next Post

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

Next Post
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

ताज्या बातम्या

cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011