नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सिडकोत मॅफेड्रोन या अमली पदार्थची विक्री करणा-या दोघा प्लेडरांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत एमडीसह मोबाईल व रोकड असा सुमारे १ लाख ७७ हजार २३० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यत आला आहे.
साहिल उर्फ विवेक अनिल गांगुर्डे (२४ रा.बसस्टॉप जवळ पवननगर) व अमित उर्फ अभी नितीन पाटील (२० रा.अक्षय चौक,पवननगर) अशी अटक करण्यात आलेल्या एमडी प्लेडरांची नावे आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी निरीक्षक सुशिला कोल्हे यांना याबाबत माहिती मिळाली होती. पवननगर येथील अंबड लिंकरोडवरील हनुमान मंदिर परिसरात एमडी या अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.१३) परिसरात सापळा लावण्यात आला होता. दोघांच्या मुसक्या आवळत पथकाने अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ०९.५ गॅ्रम वजनाचा मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ मिळून आला. या कारवाईत एमडी अमली पदार्थासह संशयितांच्या ताब्यातून मोबाईल व रोकड्सा सुमारे १ लाख ७७ हजार २३० रूपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून संशयितांसह मुद्देमाल अंबड पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सुशिला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील,जमादार रंजन बेंडाळे,देवकिसन गायकर,संजय ताजणे हवालदार भारत डंबाळे, पोलीस नाईक सौंदाणे,गणेश वडजे अंमलदार बाळासाहेब नांद्रे,योगेश सानप,चंद्रकांत बागडे,अविनाश फुलपगारे,अर्चना भड आदींच्या पथकाने केली.