नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक पोलीसांच्या हाती महागडया चोरीच्या कार परप्रांतात विक्री करण्या-या टोळीचा म्होरक्या लागला आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर शहरातून चोरलेल्या दोन कार तामीळनाडू व कर्नाटक राज्यात विक्री केल्याचे समोर आले आहे. शहर गुन्हे शाखेच्या मोटारसायकल चोरी शोध पथकाने शिरूर (जि.पुणे) येथे संशयितास बेडया ठोकल्या असून, त्याने विक्री केलेल्या दोन कार हस्तगत केल्या.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख नदीम शेख दाऊत (३२, रा. धाड, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तर किशोर पवार, विशाल जाधव व डेवीड नामक त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. शहर परिसरातून दुचाक्यांसह महागड्या कार चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हेशाखेच्या मोटार सायकल चोरी शोध पथक करीत होते. या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पथकाचे उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, रवींद्र दिघे, भगवान जाधव हे बुलढाण्यासह परजिल्ह्यात संशयितांचा शोध घेण्यासाठी गेले होते.
यातून संशयित नदीम हा कारचोरीचा आंतरराज्य टोळीचा मुख्य संशयित असल्याचे समोर आले.
त्याचा शोध घेत असताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने नदीम यास शिरूर येथून अटक करण्यात आली. त्याने संशयित पवार व जाधव यांच्या मदतीने नाशिकसह अन्य ठिकाणाहून कार चोरी करून त्या तामीळनाडू व कर्नाटक राज्यात विक्री केल्याचे कबुली दिली. नाशिकमधील कार त्याने तामीळनाडूत संशयित डेविड याच्या माध्यमातून विक्री केल्याचे समोर आले असून त्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. पसार असलेल्या तीनही संशयिताचा पोलीस शोध घेत असून ते लवकरच हाती लागतील असा विश्वास पोलीस सुत्रांनी वर्तवलिा आहे.
संशयित नदीम शेख याच्या अटकेने शहरातील मुंबई नाका व उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक जतिेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनरिीक्षक मुक्तेश्वर लाड, प्रभाकर सोनवणे, हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रेय चकोर पोलीस नाईक मंगेश जगझाप,रविंद्र दघिे,अंमलदार भगवान जाधव,गणेश वडजे हवालदार संदिप हिवाळे,स्वप्निल सपकाळे आदींच्या पथकाने केली.