मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हप्ता न दिल्याने संतप्त टोळक्याने घराच्या काचा फोडल्या…नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by India Darpan
मे 14, 2025 | 7:40 am
in क्राईम डायरी
0
fir111

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– हप्ता न दिल्याने संतप्त टोळक्याने घराच्या काचा फोडून परिसरात दहशत माजविल्याची घटना विहीतगाव येथे घडली. या घटनेत चार जणांच्या टोळक्याने दरवाजा व प्लॅस्टीकचे ड्रम धारदार कोयत्याने फोडून नुकसान केले असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल उर्फ भांड्या तेलोरे (रा.बागुलनगर,विहीतगाव), अनिकेत उर्फ केरला राजू जॉन (रा.सुभाषरोड ना.रोड), समिर शेख (रा.विजयनगर, जयभवानीरोड) व यश दंडगव्हाळ (रा.जेलरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित गावगुंडाची नावे आहेत. याबाबत अशोक हिरामण बागुल (६१ रा.बागुलनगर विहीतगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बागुल वाहनचालक असून संशयितांनी त्यांच्याकडे एप्रिल महिन्यात हप्ता मागितला होता. मात्र त्यांनी तो दिला नाही.

या रागातून दुचाकींवर आलेल्या संशयितांनी सोमवारी (दि.१२) मध्यरात्री बागुलनगर भागात धुडघूस घातला. परिसरात दहशत माजवित टोळक्याने आपला मोर्चा बागुल यांच्या घरावर वळविला. धारदार कोयत्याने घराच्या खिडकीच्या काचा फोडत दरवाजावर कोयता मारला. यानंतर घराबाहेर पाणी भरूण ठेवलेले चार प्लॅस्टीकचे ड्रम फोडून नुकसान केले असून या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. विहीतगाव येथे गावगुंडाचा सर्रास वावर असून पोलीसांनी त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

पिस्तूल बाळगणा-याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जेलरोड येथील पंचक भागात पिस्तूल बाळगणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून गावठी पिस्तूलसह जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसिफ अन्सार कुरेशी (२६ रा.निमसे मळा, नांदूरनाका कमळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या पिस्तूलधारीचे नाव आहे. पंचक येथील सायट्रीक समोरील मोकळया जागेत थांबलेल्या एका तरूणाकडे पिस्तूल असल्याची माहिती नाशिकरोड पोलीसांना मिळाली होती.

पथकाने सोमवारी (दि.१२) रात्री धाव घेत संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा व जीवंत काडतुस असा सुमारे २५ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज मिळून आला. याबाबत अंमलदार नितीन भामरे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय दुचाकीस्वार ठार

Next Post

गावातील ६० रेशनकार्ड काढून देण्यासाठी २६ हजाराची मागणी…पुरवठा निरीक्षण अधिका-यासह एकावर गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
acb

गावातील ६० रेशनकार्ड काढून देण्यासाठी २६ हजाराची मागणी…पुरवठा निरीक्षण अधिका-यासह एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011