नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात नाशिक पुणे मार्गावरील दत्त मंदिर चौकात झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पसार झालेल्या कंटेनर चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतिश बाबुलाल जाधव (५६) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. जाधव गेल्या शुक्रवारी (दि.९) दुपारच्या सुमारास एमएच १५ एफए १०६७ या अॅक्टीव्हा दुचाकीवर सिन्नर फाट्याकडून नाशिकच्या दिशेने जात असतांना हा अपघात झाला. दत्त मंदिर चौक परिसरात जे ०७ यू २९५७ या कंटेनरने दुचाकीस धडक दिली. अपघातातनंतर कंटेनर चालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे.
या अघातात गंभीर जखमी झालेल्या जाधव यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी मुलगी कविता सुधीर सुर्वे (रा.नारायणबापू नगर,ना.रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुयोग वायकर करीत आहेत.