नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वडाळा पाथर्डी मार्गावरील सिमेन्स कॉलनी भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दहा लाख रूपये १७ हजार रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यास २० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलींद बलभिम मुरूगकर (६२ रा.सिमेन्स कॉलनी मागील गेट जवळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मुरूगकर कुटुंबिय बुधवारी (दि.७) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली.
अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लॉकरमध्ये ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १० लाख १७ हजार १०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.