नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून माहेरच्या मंडळीने एका महिलेची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत १४ लाख रूपयांना गंडा घालण्यात आला असून, साडे पाच वर्ष उलटूनही नोकरी व पैसे परत न मिळाल्याने विवाहीतेने पोलीसात धाव घेतली आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित लक्ष्मण दिपक, राहूल रोहिदास दिपक, उषा रोहिदास दिपक, करूणा सुशिला बोढारे व दर्शन राहूल दिपक (रा.जुना कथडा टाकळीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याबाबत मिनाक्षी शशिकांत शेवाळे (रा.शरद पिंगळे नगर,पेठरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारदार शेवाळे यांचे संशयित आई वडिल भाऊ बहिण व भावजई असून, विवाहीत असलेल्या मिनाक्षी शेवाळे यांना संशयितांनी सन. २०१९ मध्ये महापालिकेत नोकरी लावून देण्याची आमिष दाखविले होते.
शेवाळे कुटुंबियांचा विश्वास संपादन करण्यात आल्याने यापोटी संशयितांना जुलै २०१९ मध्ये १४ लाख रूपयांची रक्कम अदा करण्यात आली. मात्र साडे पाच वर्ष उलटूनही नोकरी लागली नाही. तसेच संबधीतांनी पैसेही परत केले नाही. त्यामुळे शेवाळे कुटुंबियांनी पैश्यांचा तगादा लावला असता संशयितांनी टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक रणदिवे करीत आहेत.