नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– फर्निचर खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकाची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शिंगाडा तलाव येथील स्टार लाईन फर्निचर दुकानात घडली. या बॅगेत एक लाखाची रोकड होती. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनार्दन हरी खोटरे (रा. पारिजातनगर महात्मानगर) यांनी फिर्याद दिली आहे. खोटरे दांम्पत्य शनिवारी दुपार फर्निचर खरेदीसाठी स्टार लाईन या शोरूममध्ये गेले होते. तीस हजार रूपये किमतीच्या फर्निचरची खरेदी करून दाम्पत्याने काऊंटरवर रक्कम अदा केली. यावेळी मालकाशी अन्य फर्निचर बाबत चर्चा करीत असतांना दाम्पत्याने काऊंटरवर ठेवलेली हॅण्डबॅग विसरले.
ही बाब घरी परतल्यानंतर निदर्शनास आल्याने खोटरे यांनी पुन्हा दुकानात धाव घेतली असता एक लाखाची रोकड असलेली बॅग कुणी तरी लांबविल्याचा प्रकार समोर आला. अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.
घरफोडीत चोरट्यांनी ३३ हजाराच्या ऐवजावर मारला डल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बोरगड परिसरातील श्रीरामनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ३३ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात घरातील टिव्हीसह गॅस टाक्या चोरट्यानी चोरून नेल्या असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश महारू पवार यानी फिर्याद दिली आहे. पवार कुटुंबिय दि.१ ते ३ एप्रिल दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील टिव्ही व सिलेंडर असा सुमारे ३२ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार खराटे करीत आहेत.