नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भांग या अमली पदार्थाची विक्री करणा-या विक्रेत्याच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयिताच्या ताब्यातून सुमारे सहा किलो ओली भांग हस्तगत करण्यात आली असून ही कारवाई शालिमार येथील नेपाळी कॉर्नर भागात करण्यात आली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईश्वर राजेंद्र गुरगुडे (२६ रा. गुरगुडे चाळ रामवाडी) असे भांग विक्रेत्याचे नाव आहे. शिवाजीरोडवरील नेपाळी कॉर्नर या भागात एक तरूण अमली पदार्थाची विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.४) सायंकाळी भद्रकाली पोलीसांनी धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
त्याच्या अंगझडतीत ६ किलो वजनाची व बाराशे रूपये किमतीची ओली भांग मिळून आली असून याबाबत अंमलदार धनंजय हासे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.