नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मद्याच्या नशेत घरात घुसून एका परिचीताने अंगलट करीत महिलेचा विनयभंग केला. ही घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली असून या घटनेत संशयिताने पीडितेच्या आईला मारहाण केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत सोनवणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मद्याच्या नशेत असलेल्या परिचीताने बेकायदा घरात प्रवेश करून महिलेशी अंगलट करीत विनयभंग केला.
महिलेने त्यास सुनावले असता जातांना त्याने कामावरून परतणा-या पीडितेच्या आईची वाट अडवित तिला मारहाण केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बर्वे करीत आहेत.