नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रवाश्यांना सुरक्षीत स्थळी हलवित असतांना कंडक्टरचे तिकीट मशिन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना महामार्गावरील राणे नगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर बबन नागरे (रा.हनुमानचौक सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नागरे एस.टी. महामंडळात वाहक पदावर कार्यरत असून सोमवारी (दि.२८) ते शिवशाही बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. इगतपुरीच्या दिशेने निघालेली शिवशाही बस उड्डाणपूलावरील जात असतांना साई पॅलेस हॉटेलसमोर बंद पडल्याने ही घटना घडली.
बसमधील प्रवाश्यांना अन्य वाहनातून मार्गस्त करीत असतांना व सुरक्षीत स्थळी हलवित असतांना अज्ञात चोरट्यांनी वाहक आसनावर ठेवलेले सुमारे ४० हजार रूपये किमतीचे तिकीट काढण्याचे इलेक्ट्रीक मशिन चोरून नेले. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.