नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– लनातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात घडली होती. सदर तरूणावर गेली तीन दिवस उपचार सुरू होते. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक माधव जोगदंड (रा.वृंदावननगर,अंबड) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दिपक जोगदंड यास गेल्या गुरूवारी (दि.२४) रात्री शांतीनगर भागात मेव्हण्यासह काही नातेवाईकांनी काही तरी कारणातून बेदम मारहाण केली होती.
या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्यास आई कल्पना जोगदंड यांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते त्यानंतर त्यास मेडिकल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असता रविवारी (दि.२७) उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. अघिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.