नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मैत्रीत अल्पवयीन मुलीचा एकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताने धमकात मुलीस आपल्या घरी नेल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमन पठाण (रा.जाकिर हुसेन हॉस्पिटलजवळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयिताने मैत्री करीत हे कृत्य केले. गेल्या आठ महिन्यात संशयिताने रिलेशन शिपमध्ये राहण्यास जबरस्ती केली. मात्र मुलीने नकार देताच त्याने कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देत गोळे कॉलनीतील एका मेडीसीन एजन्सीत व केटीएचएम कॉलेजच्या बोट क्लब भागात घेवून जात तिचा विनयभंग केला.
बुधवारी (दि.२३) मुलीस तो महाविद्यालयातून परस्पर आपल्या घरी घेवून गेल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. रात्री बराच वेळ उलटूनही मुलगी घरी न परतल्याने कुटुंबियानी मुबईनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. या घटनेची कुणकुण लागताच संशयिताने नातेवाईकांना सोबत घेत मुलीस कुटुंबियांच्या स्वाधिन केले असून तिने आपबिती कथन केल्याने याप्रकरणी पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डगळे करीत आहेत.