नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी, आडगाव व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होवू लागली आहे.
म्हसरूळ येथील किशोर सुर्यवंशी मार्ग भागात राहणारे बाळू रामचंद्र कालेकर हे गेल्या गुरूवारी (दि.१७) सायंकाळी मेरी परिसरात गेले होते. रेणूका माता बेकरी समोर पार्क केलेली त्यांची शाईन एमएच १५ जेई ७२७९ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार भोये करीत आहेत.
दुसरी घटना अपोलो हॉस्पिटल भागात घडली. प्रतिभा राजीव गोसावी (रा.बिडी कामगारनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गोसावी या मंगळवारी (दि.१५) दुपारी अपोलो हॉस्पिटल येथे गेले होत्या. पार्किंगच्या भिंतीजवळ लावलेली त्यांची अॅक्टीव्हा एमएच १८ एक्यू ९१२४ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.
तिसरी घटना नाशिकरोड येथील शाहूनगर भागात घडली. याबाबत संदिप शंकरराव शिमगेकर – भावसार (रा. एलआयसी आॅफिस मागे शाहूनगर) यानी फिर्याद दिली आहे. शिमगेकर यांची बुलेट एमएच १५ एफए ५५३२ गेल्या गुरूवारी (दि.१७) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार हिवाळे करीत आहेत.