नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात महिला व मुली असुरक्षीत असून वेगवेगळया भागात राहणा-या दोघींचा परिचीतांकडून विनयभंग करण्यात आला. त्यातील एकीचा दिराने तर दुसरीचा पूर्ववैमनस्यातून एकाने विनयभंग केला. याप्रकरणी म्हसरूळ आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
म्हसरूळ येथील निसर्ग नगर भागात राहणा-या पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पतीच्या निधनानंतर सासरची मंडळीने तिचा मानसिक व शारिरीक छळ केला. जिवे मारण्याची धमकी देत तिच्या अंगवरील अलंकार परस्पर बँकेत गहाण ठेवण्यात आले. स्व:ताच्या मालकिच्या घरातून काढण्यासाठी शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. दिराने विनयभंग करीत पुन्हा घरात आली तर बलात्कार करून बदनामी करेल अशी धमकी दिल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मयुरी बयस – तुरे करीत आहेत.
दुसरी घटना शिंगवे बहुला येथे घडली. पीडिता व कुटुंबिय विवाह सोहळयानिमित्त सोमवारी (दि.१४) आपल्या घरासमोर मेहंदी काढत असतांना ही घटना घडली. हातात कु-हाड घेवून आलेल्या विशाल उघडे याने जुन्या भांडणाची कुरापत काढून बुध्दविहार जवळ बसलेल्या महिलेच्या पतीस शिवीगाळ केली. यावेळी पीडितेसह अन्य महिला त्यास समजावून सांगत असतांना संशयिताने पीडितेस अश्लिल शिवीगाळ करीत विनयभंग केला. यावेळी त्याने महिलेस मारहाण करून तिच्या पतीस शिवीगाळ करीत अंगावर धावून आला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.