नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पंचवटीतील नागचौक भागात राहणा-या ३२ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अक्षय कैलास आंबरे (३२ रा. साई मंदिरामागे,जोशीवाडा) असे मृत युवकाचे नाव आहे. आंबरे याने शनिवारी (दि.१९) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्श नास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
गोडावून फोडून चोरट्यांनी वायर बंडल व कॉपर केबल चोरून नेले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील गोडावून फोडून चोरट्यांनी वायर बंडल व कॉपर केबल चोरून नेले. या घटनेत २५ हजार रूपये किमतीचे २८ बंडल व कॉपर अरमाड असा सुमारे सात लाख रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदिप उत्तम कारे (रा.अंबिकानगर,डीजीपीनगर अंबड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. डीएस केबल अॅण्ड स्विच गेअर येथे ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि.२०) शकुंतला प्लाझा येथील कंपनी व शेजारील गोडावून मधून ६-४ कॉपर अरमाड चे ८० मिटर लांबिचे व ४० किलो वजनाचे सुमारे २५ हजार रूपये किमतीचे वायर बंडल असा सुमारे सात लाख रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भंडे करीत आहेत.