नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सलून दुकान फोडून चोरट्यांनी गल्यातील रोकडसह साहित्यावर डल्ला मारला. या घटनेत पंधराशे रूपयाच्या रोकडसह दुकानातील कातरी,कटींग मशि,टेबल पंखा,हेअर ड्रायर मसाज मशिन असा सुमारे २० हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळविला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोशन खेमराज शर्मा (२३ रा.यशोदानग,मेहरधाम) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शर्मा यांचे सराफ बाजारातील पुष्पम प्लाझा या इमारतीत शर्मा सलून नावाचे दुकान असून गुरूवारी (दि.१७) रात्री ते चोरट्यांनी फोडले.
अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे कुलूप तोडून गल्यातील १ हजार ५०० रूपयांची रोकड व साहित्य असा सुमारे १९ हजार ३०० रूपयांचा ऐवज चोरून नेला असून अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.
……….