नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरात कुणी नसल्याची संधी साधत दोघांनी घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची घटना जेलरोड परिसरातील शिवाजीनगर भागात घडली. या घटनेत नकार दिल्याने महिलेसह तिच्या भावास संशयितांनी मारहाण केली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश ताजनपुरे (रा.चेहडी पंपीग) व त्याचा साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत साईबाबा मंदिर परिसरात राहणा-या पीडितेने फिर्याद दिली आहे. पीडिता शुक्रवारी (दि.१८) दुपारच्या सुमारास आपल्या घरात एकटी असतांना ही घटना घडली. नाशिकरोड येथील आयएसपी प्रेस मध्ये काम करणा-या संशयिताने आपल्या साथीदारास सोबत घरात घुसून महिलेशी अंगलट केली.
यावेळी महिलेने नकार दिला असता संशयिताने तिच्यासह घरी आलेल्या भावास शिवीगाळ करीत मारहाण केली व दोघांना बघून घेण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पलांडे करीत आहेत.