नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शिक्षकाने महिला सहका-यास शिवीगाळ करीत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे संस्था पदाधिकारी आणि शिक्षकांच्या बैठकीत हा प्रकार घडला असून याप्रकरणी इदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय काळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित शिक्षकाचे नाव आहे. संशयित आणि तक्रारदार महिला एकाच शाळेत शिक्षक म्हणून नेमणुकीस असून इंदिरानगर येथील एका माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला. गुरूवारी (दि.१७) दुपारी शाळेत संस्था पदाधिकारी व शिक्षकांची बैठक पार पाडली.
या बैठकीत संशयितासह तक्रारदार शिक्षीका हजर होत्या. तुझ्यामुळे शाळेची बदनामी झाली या वादातून ही घटना घडली. नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत संशयिताने आपल्या सहकारी महिलेस सर्वासमोर अश्लिल शिवीगाळ करीत विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.