नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावर ठेवणा-या तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई सातपूर बस स्टॅण्ड भागात करण्यात आली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल विष्णू भालेराव उर्फ मुक्या (२५ रा.महादेवनगर सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या तडिपाराचे नाव आहे. कुणाल भालेराव याच्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी पोलीसांनी त्याच्या विरूध्द हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिल्ह्यातून त्यास सहा महिन्यांसाठी हद्दपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच होता. पोलीस त्याच्या मागावर असतांना बुधवारी (दि.१६) तो सातपूर गाव बसस्टॅण्ड भागात मिळून आला याप्रकरणी अंमलदार सागर गुंजाळ यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार खरपडे करीत आहेत.
४० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात राहणा-या ४० वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संतोष दत्ताराव गायकवाड (रा.घरकुल योजना चुंचाळे शिवार) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गायकवाड यांनी गुरूवारी (दि.१७) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये लोखंडी खिडकीला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.