नाशिक : अल्पवयीन मुलीस खेळण्याच्या बहाण्याने टेरेसवर घेवून जात एकाने लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलीसांनी संशयितास हुडकून काढले असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिष्णा उफाडे (२२ रा. जुना गंगापूर नाका) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयिताने बुधवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास आपल्या इमारतीत वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीस खेळण्याच्या बहाण्याने टेरसवर घेवून जात हे कृत्य केले. मुलगी बराच वेळ उलटूनही घरात न परतल्याने तिच्या आईने शोधाशोध केली असता हा प्रकार समोर आला.
महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने दुस-या दिवशी कॅनडा कॉर्नर भागातून संशयितास हुडकुन काढले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.