नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दोन वाहनधारकामधील वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलीसावर एकाने आरेरावी करीत अॅटो रिक्षा घातल्याचा प्रकार द्वारका भागात घडला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष शशिकांत खांडवे असे संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत शहर वाहतूक शाखेच्या युनिट २ अंमलदार साईनाथ साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. साळुंखे बुधवारी (दि.१६) काठे गल्ली सिग्नल भागात सेवा बजावत होते. नाशिकरोड कडून येणा-या व सिग्नलवर थांबलेल्या एमएच १५ एफयु ७३८२ वरिल अॅटोरिक्षाचालक व त्यांच्या पुढे डबलसिट उभ्या असलेल्या दुचाकीस्वारांमध्ये वाद सुरू होता.
वाहन बाजूला घेण्याच्या वादातून दोघे सिग्नलवरच एकमेकांना भिडल्याने अंमलदार साळुंके यांनी धाव घेतली असता हा प्रकार घडला. कश्यावरून वाद सुरू आहे याबाबत साळुंके यांनी विचारणा केली असता संशयित रिक्षाचालकाने तुम्ही पण बाजूला व्हा अशी आरेरावी व शिवीगाळ करीत साळुंके यांच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.