नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- न्यायालयीन कामकाजासाठी कुटुंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडून सुमारे सव्वा सात लाख रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना माडसांगवी ता.जि.नाशिक येथे घडली. या घटनेत सहा लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे चोरट्यांनी पळविले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल वसंत सोळसे (रा.माडसांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. सोळसे कुटुंबिय गुरूवारी (दि.१७) न्यायालयीन कामकाजा निमित्त पिंपळगाव ब. येथे गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा व कुलूप तोडून कपाटात ठेवलेली सहा लाखाची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७ लाख २४ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.