शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये तीन घरफोडीच्या घटना….चोरट्यांनी सव्वा अकरा लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

by India Darpan
एप्रिल 17, 2025 | 5:43 pm
in क्राईम डायरी
0
crime 88


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा अकरा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ, मुंबईनाका व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

म्हसरूळ येथील रिलायन्सन पेट्रोलपंप परिसरात राहणारे निलेश शंकर शिंगे (३० रा.निसर्ग नगर) यांनी घरफोडीची पहिली तक्रार दिली आहे. शिंदे कुटुंबिय दि.१० ते १५ एप्रिल दरम्यान धार्मिक कार्यक्रमासाठी रायगड येथील गावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटच्या उघड्या गॅलरीमधून घरात प्रवेश करीत ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले सुमारे ६ लाख ११ हजार ७३३ रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.

दुसरी घटना पखालरोड भागात भरदिवसा घडली. प्रेमलता राजेश कापडणीस (रा. सागर सम्राट स्विटसच्या वरती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कापडणीस कुटुंबिय मंगळवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडून कपाटात ठेवलेली ९ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५ लाख ४०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.

तिसरी घटना चुंचाळे शिवारात घडली. विजय रामचंद्र शिरसाठ (रा.गोदावरीनगर, चुंचाळेशिवार) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिरसाठ कुटुंबिय मंगळवारी (दि.१५ ) बाहेरगावी गेले असता ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून किचनमधील लोखंडी कपाटात ठेवलेले पाच हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

२४ कोचिंग सेंटर्सना ७७.६० लाखाचा दंड…४९ सेंटरला नोटिसा जारी केल्या

Next Post

हा नवीन पॉवरहाऊस ‘ए९५ ५जी’ स्‍मार्टफोन लाँच…जाणून घ्या फोनची वैशिष्ट्ये व किंमत

Next Post
A95 KV 2 scaled e1744892670302

हा नवीन पॉवरहाऊस ‘ए९५ ५जी’ स्‍मार्टफोन लाँच…जाणून घ्या फोनची वैशिष्ट्ये व किंमत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011