नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- निर्भय पक्ष पदाधिका-यांवर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरू असून मुंबईनाका पोलीस ठाण्यात आता खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधीत पदाधिका-यानी तक्रार मागे घेण्याच्या मोबदल्यात पाच लाख व सोशल मीडियावरील व्हिडीओ डिलीट करण्यासाठी दोन लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र भावे, नितीन जाधव, प्रविण जाधव,सचिन जाधव त्यांचे सहा सात कार्यकर्ते अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत राजेंद्र बोडके (रा.विनायकनगर,अशोकामार्ग) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित गेल्या वर्षभरा पासून त्रास देत असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आहे. जून ते ऑगष्ट २०२४ या काळात संशयितांनी बोडके यांच्या विरोधात खोटी तक्रार अर्ज दाखल केला होता. तक्रारी अर्ज मागे घेण्याबरोबरच फ्लॅट रिटर्न करण्यासाठी ५ लाखाची मागणी करण्यात आली असे तक्रारीत म्हटले आहे.
संशयित प्रविण जाधव याने वेळोवेळी पत्नीच्या मोबाईलवर संपर्क साधत धमकावून पैश्यांची मागणी केली. याापाठोपाठ भावे व त्यांच्या साथीदारांनी पत्नी व तीन वर्षीय नातीचा फोटोचा गैरवापर करीत बदनामी केली. सोशल मीडियावरही त्याबाबतचे चित्रीकरण व्हायरल करण्यात आले. तसेच व्हायरल व्हिडीओ मागे घेण्यासाठी दोन लाखाची खंडणी मागितल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गाडे करीत आहे.