गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भागीदारीतील व्यवसायाचे आमिष दाखवत व्यावसायीकाला ८६ लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

by Gautam Sancheti
एप्रिल 17, 2025 | 3:56 pm
in क्राईम डायरी
0
crime1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भागीदारीतील व्यवसायाचे आमिष दाखवत भामट्यांनी एका व्यावसायीकाला तब्बल ८६ लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. भांडवलासह बँक कर्ज मंजूरीसाठी भामट्यांनी ही रक्कम उकळली असून, साडे तीन वर्ष उलटूनही कुठलाही मोबदला पदरात न पडल्याने व्यावसायीकाने पोलीसात धाव घेतली आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजीत नारायण पाटील, रोशनी अजित पाटील (रा.दोघे अलिबाग जि.रायगड) व रामदास पोपलेट उर्फ प्रविण पाटील (रा.खारघर नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठकबाजांची नावे आहेत. याबाबत प्रशांत दामोदर कातकाडे (रा.येवला रोड मनमाड,ता.नादगाव) यांनी फिर्याद दिली आहे. कातकाडे यांची आॅक्टोबर २०२१ मध्ये संशयितांची भेट झाली होती. या भेटीत पाटील दांम्पत्याने कातकाडे यांचा विश्वास संपादन करीत एकत्रीत कृषी माल निर्यात व सप्लाय चैन व्यवसायाचे आमिष दाखविले. कातकाडे गळाला लागताच संशयितांनी व्यवसाय सुरू असल्याचे भासवून भांडवलापोटी ६० लाख ७५ हजाराची रक्कम कातकाडे यांना गुंतविण्यास भाग पाडले.

एवढ्यावरच न थांबता भामट्या दांम्पत्याने प्रविण पाटील हा युको बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून कर्ज प्रकरण मंजूर करण्याच्या नावाखाली व कागदपत्र पुर्ततेच्या बहाण्याने कातकडे यांच्याकडून पुन्हा २५ लाख ५० हजार रूपये उकळले. मात्र साडे तीन वर्ष उलटूनही एक रूपयाही पदरात न पडल्याने फसवणुक झाल्याचे लक्षात येताच कातकाडे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डंबाळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नव्या वक्फ कायद्यातील दोन कलमांना सर्वोच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती…आता या तारखेला पुढील सुनावणी

Next Post

निर्भय पक्ष पदाधिका-यांवर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरूच…आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
fir111

निर्भय पक्ष पदाधिका-यांवर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरूच…आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

kapus

कापूस आयात शुल्क माफीचा निर्णय: शेतकरी नाराज

ऑगस्ट 21, 2025
Screenshot 20250821 161509 Facebook 1

नाशिक महानगरपालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई….या भागात रस्त्यालगत उभारलेली ३० अनधिकृत गाळे व पत्राशेड हटवले

ऑगस्ट 21, 2025
प्रातिनिधिक फोटो

दिवाळी आणि छठ पूजेसाठी १२ हजाराहून अधिक विशेष रेल्वे गाड्या…परतीच्या तिकिटांवर इतके टक्के सूट

ऑगस्ट 21, 2025
Untitled 26

सात दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत प्रसारित….राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

ऑगस्ट 21, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांनी पावणे दोन लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…आडगाव शिवारातील घटना

ऑगस्ट 21, 2025
cbi

CBI ने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकाला ६० हजाराची लाच घेतांना केली अटक…

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011