नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वर्दळीच्या कॉलेजरोड भागात झालेल्या दोन घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे तीन लाख रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला त्यात रोकडसह सोन्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
अच्युत भाऊराव चकोर (रा. निलेश अपा.पाटील लेन नं.४) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चकोर कुटुंबिय ११ ते १४ एप्रिल दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली दहा हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ५५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
दुसरी घरफोडी सहदेवनगर भागात घडली. सागर संभाजी खैरणार (रा.मोहिननी अपा.सहदेवनगर) यांनी याबाबत पोलीसात धाव घेतली आहे. खैरणार कुटुंबिय याच काळात बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरटंनी त्यांच्या बंद घराचे लॅच लॉक तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुामारे १ लाख ६ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. दोन्ही घटनांप्रकरणी एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात ३ लाख ६१ हजार रूपये किमतीच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला. अधिक तपास हवालदार महाले करीत आहेत.