नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पिकअप वाहनातून प्रवास करीत असतांना चालकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार महामार्गावर घडला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ वर्षीय पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडिता व तिची आई रविवारी (दि.१३) विल्होळी भागात गेल्या होत्या. रात्री घरी परण्यासाठी त्या पिकअप वाहनातून प्रवास करीत असतांना ही घटना घडली.
महामार्गावरील सीएनजी पंप येथून त्या मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणा-या पिकअप मालवाहू वाहनात बसल्या होत्या. चालकाच्या बाजूला बसलेल्या मुलीचा संशयिताने विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भंडे करीत आहेत.