नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विवाहाची मागणी घालत एका तरूणीचा तिच्या आतेभावाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला. वडिलांसह चुलत्याशी वाद घातल काका पूतण्याने युवतीचा ठरलेला विवाह मोडत तरूणीची बदनामी केल्याने हा प्रकार पोलीसात गेला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल जाधव,ललित संगमनेरे व बाळासाहेब जाधव (रा.सर्व खेरवाडी ता.निफाड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यातील अमोल जाधव व बाळासाहेब जाधव हे काका पुतणे आहेत. नवीन जकातनाका भागात राहणा-या युवतीने याबाबत फिर्याद दिली आहे. अमोल जाधव हा संशयित पीडित युवतीचा आतेभाऊ असून ऑक्टोबर २०२३ पासून तो पीडितेला त्रास देत आहे. शारिरीक संबधासह लग्नाच्या मागणीसाठी वेळवेळी मोबाईलवर संपर्क साधत तसेच मित्रासमेवत पाठलाग करून शिवीगाळ करीत विनयभंग केला व माझ्याशी लग्न नाही केले तर उचलून नेण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
दरम्यानच्या काळात संशयिताने मुलीचे ठरलेले लग्न बदनामी करून मोडले असून काका बाळासाहेब जाधव याना सोबत घेत त्याने वडिल व चुलत्याशी वाद घालत शिवीगाळ करून मुलीचे लग्न कसे होते तेच बघतो अशी धमकी दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मयुर निकम करीत आहेत.