नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील अवैध धंदे रोखण्यासाठी ग्रामिण पोलीसांनी पुन्हा एकदा कंबर कसले आहे. गुरूवारी (दि.३) वेगवेगळया पथकानी सिन्नरसह विल्होळीत छापेमारी केली. या कारवाईत अमली पदार्थ तस्करी रोखण्यासह जुगार अड्डा व वेश्या व्यवसाय उध्वस्त करण्यात आला. दोन्ही ठिकाणच्या कारवाईत तब्बल ३६ जणावर गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे सहा लाख ६३ हजार ३२४ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यात गांजा,भांगपावडर व जुगाराच्या साहित्याचा समावेश आहे.
पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने व अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी भापोसे अपराजीता अग्निहोत्री यांच्या विशेष पथकाने सिन्नर शहरातील वेगवेगळय़ा भागात बुधवारी (दि.३) छापेमारी केली. लोंढे गल्लीत राजरोसपणे अमली पदार्थाची बेकायदा विक्री होत असल्याच्या मााहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात ९.९४४ किलो गांजा व २२ किलो ६७० ग्रॅम भांग पावडर असा सुमारे ३ लाख २६ हजार १४० रूपयांचा अमली पदार्थ व रोख रक्कम असा ५ हजार २३ हजार ९५० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत अमली पदार्थाची विक्री करणा-या गणेश प्रकाश गोळेसर (४४) व श्रावण नारायण पगारे (३६ रा.दोघे लोंढे गल्ली ) यांच्यासह जय सुनिल सांगळे (१९ रा.वडगाव सिन्नर), पुनाजी भरत भोईर (३५ रा.अकोले जि.अहिल्यानगर),अजय राजू चव्हाण (२४ रा.विजयनगर सिन्नर), दिपक कुमार वर्मा (४० रा.माळेगाव एमआयडीसी), शंभू शहा अशरफी शहा (४५ रा.लोंढेगल्ली सिन्नर), मोनू रामके रविन (१८ ), भरतकुमार नागेश्वर मेहता (३६ रा.दोघे रमाळेगाव एमआयडीसी) प्रकाश एकनाथ माळी (२० रा.भाटवाडी सिन्नर),अमोल किसन शिंदे (३५ रा.हर्सुले सिन्नर), बिपेश शरद चौधरी (४२ रा.शिवाजीनगर सिन्नर) चुलखे शरद देवराज (४८ रा.माळेगाव एमआयडीसी),भारत गोकुळ पाटील (२२ रा.शिवाजीनगर सिन्नर), सुरेश रामचंद्र बिन्नर (४३ रा.पिंपळे सिन्नर),किरण गजाबा लहामगे (४४ रा.शिवाजीनगर सिन्नर), ओम नारायण थारू (३० रा.आडवाफाटा सिन्नर) व रविंद्र भारत नाठे (३१ रा.गंगावेस सिन्नर) आदींच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई उद्योगभवन परिसरातील हॉटेल न्यु सागर लॉजींग येथे करण्यात आली. या लॉजवर बेकायदा देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. पीडित महिलेची सुटका करीत पथकाने अक्षय राजेश गिते (२४ रा. कानडी मळा) व नरेश उत्तमराव कछवे (३३ मुळ रा.परभणी हल्ली भगूर जि.नाशिक) या दोघांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी कारवाई सातपीर गल्लीत करण्यात आली. गणेश शंकर लोंढे याचा जुगार अड्डा उध्वस्त करीत पथकाने लोंढे याच्यासह कचरू दामू कुवर राजेंद्र बाबुराव वाघ,गुलाब शिवराम गुंजाळ,तौसिफ शब्बीर शेख,अशोक हरिश्चंद्र गुजर,किसन जगन्नाथ झगडे,नारायण सुरेश महाले,सुनिल लक्ष्मण शिंदे,गणेश अर्जुन वायचळे,विठ्ठल नारायण कुवर,शिवा निवृत्ती झगडे, प्रदिप कचरू क्षिरसागर व प्रविण कृष्णा क्षत्रीय (रा.सर्व सिन्नर) आदी जुगारींच्या मुसक्या आवळल्या. संशयित कल्याण,श्रीदेवी टाईम नावाचा मटका जुगार खेळतांना मिळून आले.
या कारवाईत संशयितांच्या ताब्यातील रोकड,मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा सुमारे ७५ हजार ५३४ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने गुरूवारी विल्होळी येथील उड्डाणपूलाच्या बाजूला असलेल्या पानटपरीवर छापा टाकत तब्बल २ किलो १९२ ग्रॅम वजनाचा गांजा व मोबाईल असा सुमारे ६३ हजार ८४० रूपये किमतीचा ऐवज जप्त केला. या कारवाईत अशोक पोपट वाघ (४८ रा. विल्होळी ता.जि.नाशिक) व निलेश त्र्यंबक दोंदे (३५ रा.कावनई ता.इगतपुरी ) या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून याप्रकरणी नाशिक तालूका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.