नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळया भागात शुक्रवारी (दि.२७) उंचावरून पडल्याने दोन मजूरांचा मृत्यू झाला. पाण्याची टाकी साफ करतांना एकाचा तर दुस-याचा बांधकाम साईटवरील सहाव्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी व उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल सुनिल भामरे (२५ रा.त्रिमुर्ती चौक) हा युवक मंगळवारी (दि.२४) पाण्याची टाकी साफ करण्यासाठी मधूबन कॉलनी भागात गेला होता. राधा पॅलेस या इमारतीवरील तिस-या मजल्यावर काम करीत असतांना अचानक तोल जावून जमिनीवर पडला होता. या घटनेत त्यास गंभीरु दुखापत झाल्याने त्यास संजीवणी हॉस्पिटल मार्फेत सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना शुक्रवारी डॉ अपूर्वा देशपांडे यांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.
दुसरी घटना टाकळीरोड भागात घडली. कारवाई श्रीनिवास नसाआप्पा (५४ रा.मंगळवाडी जुना गंगापूररोड) हे शुक्रवारी (दि.२७) टाकळीरोडवरील चंद्रभागा एचपी पेट्रोल पंप परिसरात नव्याने सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामावर कामावर गेले होते. सहाव्या मजल्यावर काम करीत असतांना अचानक तोल गेल्याने ते जमिनीवर कोसळले होते. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने नसाआप्पा यांना चुलत भाऊ अशोक कुमार याने बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ. स्विनल पाटील यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.