नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रेमाच्या जाळयात अडकवित एकाने लग्नाचे आमिष दाखवित तरूणीवर वेळोवेळी बलात्कार केला तर वेगवेगळया भागात राहणा-या दोन तरूणींचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका व इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत राहणा-या पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार गेल्या वर्षी अहमद खान (१९ रा.भाभानगर) नामक तरूणाबरोबर तिचे प्रेमसंबध जुळले होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले असता संशयिताने पिडीतेचा विश्वास संपादन करीत लग्नाचे आमिष दाखविले. ऑगष्ट २०२४ ते ४ एप्रिल २०२५ दरम्यान संशयिताने तरूणीस भाभानगर व मुंबईनाका परिसरात नेवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तरूणीने लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे.
तर विनयभंगाचा पहिला प्रकार गोविंदनगर भागात घडला. सनी न्याहळदे (रा.शिरीन मिडोज गंगापूररोड) याने गुरूवारी (दि.३) रात्री पीडितेचा पाठलाग करीत तिचे घर गाठले. यावेळी संशयिताने घराबाहेर उभे राहून तू बाहेर ये मला तुझ्याशी बोलायचे आहे. तू माझ्याशी प्रेमसंबध ठेव असे म्हणत आरडाओरड केला. यावेळी पिडीतेने त्यास नकार दिला असता त्याने शिवीगा व जीवे ठार मारण्याची धमकी देत पिडीतेचा विनयभग केला. दोन्ही घटनांप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बलात्कार व विनयभंगाचा वेगवेगळे गु्न्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक एल.एम.शेख व हवालदार बहिरम करीत आहेत.
दुसरी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. गुरूगोविंदसिंग कॉलेज परिसरात राहणारी तरूणी बुधवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास पाथर्डी फाटा भागात गेली होती. दुचाकीवर ती घराकडे परतत असतांना मच्छी मार्केट भागात पाठलाग करीत आलेल्या वैभव कोठावदे नामक युवकाने तिचा विनयभंग केला. मोटारसायकल आडवी लावत संशयिताने पिडीतेची वाट अडवित तिचा विनयभंग केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.