नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात विनयभंगाचे प्रकार वाढले असून वेगवेगळया भागात राहणा-या दोन मुलींचा परिचीतांनी विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी म्हसरूळ आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत राहणाºया अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादी नुसार जितेंद्र खरे (रा.मेहरधाम स्टॉप जवळ,पेठरोड ) या युवकाने गेल्या पाच सहा महिन्यांपूर्वी मुलीसमवेत मैत्रीचा बहाणा केला. काही दिवसांपूर्वी मुलगी क्लासवरून आपल्या घराकडे जात असताना संशयिताने तिला गावरान हॉटेल भागात गाठले. यावेळी त्याने गप्पा मारत असतांना न कळत मुलीसोबत चुबन घेताना मोबाईल मध्ये सेल्फी फोटो काढले. कालांतराने संशयिताने इन्स्टाग्राम या सोशल साईडवर स्टोरी ठेवून बदनामी केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गावीत करीत आहेत.
दुसरा प्रकार जुने नाशिकमधील गुलालवाडी व्यायामशाळा भागात घडला. १६ वर्षीय मुलगी ढोल पथकामध्ये असतांना तिची इरफान शेख (रा.बडी दर्गा,जुने नाशिक) या संशयिताशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्याने संशयिताने १० ऑगष्ट २०२३ ते १ एप्रिल २०२५ दरम्यान मुलीस सिटी सेंटर मॉल व त्र्यंबकेश्वर येथे फिरण्यास घेवून जात दोघांनी एकत्रीत फोटो काढले. त्यानतरही संशयिताने त्र्यंबकेश्वर येथील एका लॉजमध्ये घेवून जात मुलीचे अश्लिल फोटो काढून अंगलट केले. सदरचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने मुलीने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक रणदिवे करीत आहेत.